पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी स्पष्ट केली भूमिका

महेंद्रसिंह धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्वचषक स्पर्धेनंतर मैदानात उतरल्याचे दिसला नाही. दरम्यान धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. विंडीज दौऱ्यानंतर रंगत असलेल्या चर्चेला विराट कोहलीच्या एका सोशल मीडियावरील फोटोने आणखी जोर मिळाला. मात्र बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले.

'पाक दौऱ्यातून माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कारवाई व्हायला हवी'

एकंदरीत सध्या धोनी विषयी रंगणाऱ्या चर्चेनंतर तमाम क्रिकेट चाहत्यांमध्ये तो आगामी आयपीएलमध्ये खेळणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रश्नावर चेन्नईच्या संघ मालक असलेल्या एन. श्रीनिवासन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  श्रीनिवासन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आगामी आयपीएलमध्ये महेंद्र धोनीच संघाच नेतृत्व करणार असल्याचे म्हटले आहे. धोनीविषयी मी फक्त तुमच्यासोबत एकच गोष्ट शेअर करु शकतो. ती म्हणजे आगामी आयपीएलमध्ये तोच आमच्या संघाची धूरा सांभाळेल.  

BCCI ने दिनेश कार्तिकला माफ केलं!

धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीनवेळा आयपीएल चषक उंचावला आहे. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर चेन्नई सुपर किंग्स संघावर दोन वर्षांची बंदी करण्यात आली होती. त्यानंतर संघाने २०१८ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली पुनरागमन करत तिसऱ्यांदा आयपीएल स्पर्धा गाजवली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chennai Super Kings Owner N Srinivasan Confirms Mahendra Singh Dhoni Will be Captain of CSK in Indian Premier League 2020