पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC Rankings: पाकचा गडी स्ट्राइकवर कायम, केएल राहुल नॉन स्ट्राइकला

लोकेश राहुल, बाबर आझम

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील सलामीवीर लोकेश राहुलनं दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. यष्टिमागच्या अवांतर जबाबदारीसह त्याने फलंदाजीत धमक दाखवून दिली. या कामगिरीमुळे आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत त्याने चार स्थानांनी सुधारणा करत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय. या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम ८७९ गुणांसह अव्वलस्थानी आहे. लोकेश राहुल ८२३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

NZvsIND : टीम इंडियाला मोठा धक्का! हिटमॅन वनडेसह कसोटीतूनही 'आउट'

ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच एका स्थानाच्या घसरणीसह तिसऱ्या स्थानावर गेला आहे. तर इंग्लंडचा डेव्हिड मलान दोन स्थानाच्या घसरणीसह पाचव्या स्थानावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लॅन मॅक्सवेलचीही एका स्थानाने घसरण झाली असून तो सहाव्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा याच्या क्रमवारीत देखील सुधारणा झाली आहे. तो अव्वल दहामध्ये विराजमान झालाय. विराट कोहली नवव्या स्थानावर स्थिर आहे.   

सुपर ओव्हरमधील या 'सुपर फॅक्ट' तुम्हाला माहितीयेत का?

न्यूजीलंडच्या टिम सेफर्टच्या क्रमवारीत देखील मोठी सुधारणा झाली आहे. ४३ स्थानांनी भरारी घेत तो ३४ व्या स्थानावर पोहचलाय. गोलंदाजीमध्ये जसप्रित बुमराहने २६ स्थानांनी सुधारणा करत ११ व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे टी-२० मधील गोलंदांजाच्या क्रमवारीत एका भारतीय गोलंदाजाला पहिल्या दहाध्ये स्था मिळवता आलेले नाही.  वॉशिंगटन सुंदर २२ तर युजवेंद्र चहल ३० व्या स्थानावर आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cc t20 international ranking Men s T20I Team Batting and Bowling Rankings india national cricket team on 4th position after whitewash against new zealand ind vs nz KL Rahul reached in top 2 position