पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोहलीसोबत खेळलेल्या क्रिकेटर्संना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक

मॅच फिक्सिंगप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे.

कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात दोन क्रिकेटर्संना अटक करण्यात आली आहे. ३३ वर्षीय सी गौतम आणि अबरार काझी यांना बंगळुरु गुन्हे शाखेने अटक केले आहे.  हे दोन्ही खेळाडू आयपीएलमधील रॉयल चॅलँजर्स बंगळुरुचा हिस्सा देखील राहिले आहेत. गौतम मुंबई इडियन्सच्या संघातूनही प्रतिनिधीत्व केले आहे.  

दोन्ही खेळाडूंवर केपीएलच्या यंदाच्या हंगामात संतगतीने  फलंदाजी करण्यासाठी २० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. केपीएल २०१९ च्या अंतिम सामन्यात हुबळी आणि बेल्लारी संघात स्फॉट फिक्सिंग झाले होते. या लीगमधील फिक्सिंग प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी भारतीय क्रिकेटर निशांत सिंह शेखावत याला अटक  केली होती.    

IND vs BAN : भारतीय वाघांसमोर राजकोटवर मालिका वाचवण्याचे आव्हान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबली विरुद्ध बेल्लारी यांच्यातील सामन्यातील फिक्सिंग प्रकरणात या खेळाडूंना अटक करण्यात आली आहे. सामन्यात संथगतीने खेळण्यासाठी त्यांनी २० लाख रुपये देण्यात आले होते. त्यांनी बंगळुरु विरुद्धच्या एका सामन्यातही फिक्सिंग केली होती. फिक्सिंग प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. 

उल्लेखनिय आहे की, स्थानिक क्रिकेटमधील यंदाच्या हंगामात गौतम गोवा तर काझी मिझोरामच्या संघात स्थान मिळाले होते. कर्नाटक आणि गोवा रणजीशिवाय गौतम आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्सकडूनही खेळला आहे. दोन्ही क्रिकेटर शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या मुश्ताक अली चषक स्पर्धेसाठीही निवड झाली होती.  

मिसरुड नसलेल्या पोराकडून कुबळेंच्या विश्वविक्रमी कामगिरीची पुनरावृती