पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BYJU'S टीम इंडियाची नवी प्रायोजक, बीसीसीआयचा दुजोरा

बायजूज

शैक्षणिक तंत्रज्ञान आणि ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी बायजूज (BYJU'S) टीम इंडियाची मुख्य प्रायोजक होणार असल्याच्या वृत्तास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दुजोरा दिला आहे. 

बंगळुरु येथील ही कंपनी आता टीम इंडियाच्या जर्सीवर असलेल्या ओप्पो या मोबाइल उत्पादक कंपनीची जागा घेईल. या कंपनीने ५ सप्टेंबर ते ३१ मार्च २०२२ पर्यंत टीम इंडियाचे प्रायोजकत्व घेतले आहे. बीसीसीआयने गुरुवारी एक निवदेन प्रसिद्ध करत ही माहिती दिली. बायजूज आता सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या घरगुती मालिकेत टीम इंडियाच्या जर्सीवर दिसेल. 

गांगुलीच मत कांबळीला खटकलं

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी बायजूज ही कंपनी टीम इंडियाची मुख्य प्रायोजक असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, भारतीय संघाबरोबर संलग्नित राहिल्याबद्दल मी ओप्पो कंपनीचा आभारी आहे. भारतीय संघाचे नवे प्रायोजक झाल्याबद्दल मी बायजूजचे अभिनंदन करतो. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी यापुढे आता बीसीसीआय आणि बायजूज एकत्रित काम करतील. 

यावेळी बायजूजचे मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन म्हणाले की, भारतीय संघाचा प्रायोजक होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एक शैक्षणिक कंपनीच्या रुपात बायजूज नेहमी मुलांच्या विकासासाठी मदत करेल. भारतात कोट्यवधी लोक क्रिकेटचे चाहते आहेत. आम्हाला आशा आहे की, प्रत्येक विद्यार्थी आता यामुळे प्रभावित होईल.

रोहितनं विराटनंतर अनुष्कालाही केलं अनफॉलो!

विंडीज दौऱ्यापर्यंत टीम इंडियाच्या जर्सीवर ओप्पोचा लोगो राहिल. हा दौरा ३ ऑगस्टपासून सुरु होईल आणि २ सप्टेंबरला संपेल. दक्षिण आफ्रिका १५ सप्टेंबरपासून भारताच्या दौऱ्यावर येईल. या मालिकेपासून यजमानांच्या जर्सीवरील लोगोत बदल होईल. मार्च २०१७ मध्ये ओप्पोने १-७९ कोटी रुपयांत पाच वर्षांसाठी (मार्च २०२२ पर्यंत) टीम इंडियाचे प्रायोजकत्व मिळवले होते. 

धोनी काश्मीर खोऱ्यात पेट्रोलिंग अन् गार्डची ड्युटी करणार