पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BWF WC 2019: अखेर सिंधूने सुवर्ण कामगिरी करुन दाखवली

पी.व्ही. सिंधू

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागितिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. यापूर्वी दोनवेळा सिंधूने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र तिला दोन्ही वेळेस रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. अंतिम सामन्यात तिने जपानच्या नोझोमी ओकुहारा हिला २१-७, २१-७ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

BWF WC 2019: प्रणीत! पराभवानंतरही ऐतिहासिक कामगिरी नोंदवणारा 'बाजीगर'

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेत्या सिंधूने पहिल्या सेटपासून आक्रमक खेळ करत जपानच्या ओकुहाराला सुरुवातीपासून पिछाडीवर ठेवले. पहिला सेट २१-७ असा सहज जिंकल्यानंतर दुसरा सेट याच फरकाने जिंकत तिने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अवघ्या ३७ मिनिटात सिंधूने हा सामना जिंकत ओकुहाराने २०१७ केलेल्या पराभवाचा वचपा काढला.  जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील सिंधूचे हे पहिले सुवर्ण असून यापदकासह या स्पर्धेत तिने आतापर्यंत ५ पदके जिंकली आहेत.  २०१७ आणि २०१८ मध्ये सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.  तर २०१३ आणि २०१४ मध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने कांस्य पदकाची कमाई केली होती.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BWF World Championship PV Sindhu vs Nozomi Okuhara final Sindhu becomes first Indian to win World Championship title