पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनी टी-20 वर्ल्डकप खेळण्याबद्दल ऑसी खेळाडूने दिली प्रतिक्रिया

महेंद्रसिंह धोनी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. तुर्तास या स्पर्धेसंदर्भात कोणतीही खात्री देता येण्याची परिस्थिती दिसत नाही. आयपीएल स्पर्धेतील कामगिरीवर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात खेळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. आयपीएलवर कोरोनाचे सावट आल्यामुळे धोनीच्या चाहत्यांची धडधड वाढली आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटूने धोनीबद्दल शुभ संकेत दिले आहेत.   

सरकारने शेतकऱ्यांसाठीही विशेष पॅकेजची तरतूद करावी - सोनिया गांधी

एका ट्विटर युजरने ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ब्रॅड हॉगला धोनी आगामी विश्वचषकात खेळेल का? असा प्रश्न विचारला होता. यावर हॉगने धोनी सहा महिन्यानंतर मैदानात उतरलाय असे वाटत नसल्याचे उत्तर दिले. आयपीएलच्या हंगामासाठी सराव सामन्यात धोनीने चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. याचाच दाखला देत धोनी विश्वचषकात खेळू शकेल, असा अंदाज ब्रॅड हॉगने बांधला आहे.  

'मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांनी वेळेपूर्वी येऊन स्थानकावर गर्दी करु नये'

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्परधा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकानंतर धोनी चेन्नई सुपर किंग्जडून पुनरागमन करणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीवरुन त्याला ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान देण्याबाबत विचार होऊ शकतो, असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी म्हटले होते. त्यामुळेच आयपीएल स्पर्धा धोनीसाठी महत्त्वपूर्ण आहे.