आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटून त्याच्यासाठी धोकादायक वाटणाऱ्या फलंदाजांची नावे सांगितली आहेत. विशेष म्हणजे ब्रॅड हॉगच्या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा समावेश नाही. हॉगने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने आयपीएलमध्ये कोणत्या फलंदाजासमोर गोलंदाजी करणे सर्वात आव्हानात्मक असायचे याचं गुपितही सांगितले.
यात तीन भारतीय, दोन कॅरेबियन आणि एका ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या नावाचा समावेश आहे. एका क्रिकेट चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना हॉगने आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. हॉग म्हणाला की, केरन पोलार्ड, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, ऋषभ पंत आणि क्रिस गेल यांना गोलंदाज करणे खूप अवघड जायचे. तुला कधी धोनी आणि विराटची दहशत वाटली नाही का? असा प्रश्नही एका नेटकऱ्याने त्याला विचारला होता.
ज्या फलंदाजांनी माझ्या चांगल्या गोलंदाजीवर शक्कल लढवू खेळ दाखवला आणि ज्यांच्या विरोधात क्षेत्ररक्षण लावणे खरंच कठिण गेले त्यांचा मी या यादीत समावेश केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रॅड हॉग यांच्यातील एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. एका सामन्यात हॉगने सचिनला बाद केल्यानंतर चेंडूवर त्याची स्वाक्षरी घेतली होती. सचिननेही खिलाडूवृत्तीनं चेंडूवर स्वाक्षरी केली पण त्यानंतर एकदाही तो ब्रॅड हॉगला बाद झाला नाही.