पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्सिंग: 'सुपर मॉम'विरुद्ध भिडण्याची भाषा करणाऱ्या झरीनची नवी मागणी

निखात झरीन

जागतिक कनिष्ठ स्पर्धेची माजी विजेती निखात झरीन हिने टोकिया ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग खेळाडूंची निवड चाचणी निपक्षपाती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केलीय. यासाठी ऑलिम्पिक निवड चाचणीवेळीच्या लढतींचे थेट प्रेक्षपण दाखवावे, अशी मागणी तिने राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडे केली आहे.  ऑलिम्पिक चाचणीसाठी तीन महिला बॉक्सरची नावे यापूर्वीच पक्की झाली आहेत. मंगळवारी इंडियन बॉक्सिंग लीग (आयबीएल) मध्ये मेरी कोम विरुद्ध दोन हात करुन ऑलिम्पिकच्या दिशेने वाटचाल करण्याची एक संधी निखात झरीनकडे होती. मात्र ही लढत रद्द झाल्याने झरीन निराश झाली आहे.    

INDvsWI : वर्षाअखेरपर्यंत रोहित शर्माच टॉपर राहणार की, ...

बॉक्सिंगच्या प्रत्येक वजनी गटातील चार-चार खेळाडू २७ आणि २८ डिसेंबरला चाचणीसाठी रिंगणात उतरणार आहेत. महिला गटातील ५१ किलो वजनी गटातील तीन खेळाडूंची निवड यापूर्वीच पक्की झाली आहे. ज्योती गुलिया आणि ढतू ग्रेवाल यांनी कन्नूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय चँम्पियनशीमध्ये सुवर्ण आणि रजत पदकाची कमाई करुन चाचणीसाठी आपले नाव पक्के केले. मेरी कोमने ऑक्टोबरमध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाची कमाई करत आपली जागा सुरक्षित केली होती. चौथ्या स्थानासाठी पिंकी रानी आणि निखात झरीन यांच्यात स्पर्धा आहे.  

स्मृतीची आयसीसीच्या ODI अन् T-20 संघात वर्णी

निखत म्हणाली की, बॉक्सिंग लीगमधील प्रत्येक लढत टीव्हीवर दाखवली जोते. त्यामुळेच मी लीगमध्ये सहभाग घेतला होता. ऐनवेळी मेरी कोमने लीगमधून माघार घेतली. त्यामुळे आता ट्रायल्सची तयारी करावी लागेल. मी त्यासाठी तयार आहे. पण पारदर्शक निवडीसाठी लढतीचे थेट प्रेक्षपण दाखवायला हवे, अशी मागणी निखात झरीनने केली आहे.