पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या रिंगमध्ये इतिहास घडेल, अमित पंघलला विश्वास

अमित पंघल

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक विजेता आणि भारताचा अनुभवी बॉक्सर अमित पंघलने आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदक मिळतील, असा विश्वास व्यक्त केलाय. भारताने ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये आतापर्यंत दोन कांस्य पदक जिंकली आहेत. विजेंदर सिंहने २००८ मध्ये बिजिंगमध्ये तर मेरी कोमने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. 

पैशांचा पाऊस! कमिन्ससाठी 'कोलकाता'ने मोजली मोठी किंमत

पंघलने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आगामी ऑलिम्पिंक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये किमान दोन सुवर्ण पदक मिळतील, असे म्हटले आहे. तो म्हणाले की, सध्याच्या घडीला बॉक्सिंगच्या रिंगमध्ये दर्जेदार खेळ पाहायला मिळत आहे. भारतीय बॉक्सरांनी अनेक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करुन दाखवली आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांचा दाखला देत पंघलने टोकियोत होणाऱ्या स्पर्धेत सुवर्ण कामगिरीचा विश्वास व्यक्त केला.  

अफलातून खेळीदरम्यान श्रेयसची मज्जा, विराटलाही हसू आवरले नाही

ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीबद्दल २४ वर्षीय बॉक्सर म्हणाला की, सध्या मी आशियाई ऑलिम्पिक पात्रता चाचणीमध्ये होणाऱ्या लढतीवर लक्षकेंद्रीत करत आहे. ही स्पर्धा चीनच्या वुहान शहरात पार पडणार आहे. पंघल सध्याच्या घडीला बिग बाउट इंडियन बाक्सिंग लीगमध्ये गुजरात जाएंट्सचे प्रतिनिधीत्व करताना दिसत आहे. गुजरात जाएंट्सचा संघ गुरुवारी बॉम्बे बुलेट्स विरुद्ध सेमीफायनलची लढत रंगणार आहे.