पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर आयपीएल स्पर्धा बाहेरही खेळवली जाऊ शकते

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १३ व्या हंगामातील स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयपीएलच्या स्पर्धा होणार का? तसेच झाल्यास ही स्पर्धा कधी आणि कोठे होणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना मनात निर्माण झाला आहे. त्यानंतर यंदाच्या हंगामातील स्पर्धा जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान खेळवण्यासंदर्भात बीसीसीआय विचार करत असल्याचे वृत्त आहे.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेजच्या इमारतीला भीषण आग

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयपीएल स्पर्धेचे नियोजन हे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. यावेळी स्पर्धा अवघ्या ३७ दिवसांत आटोपली होती. जुलै-सप्टेंबर दरम्यानच्या स्लॉट मिळाला तर स्पर्धेतील काही सामन्या भारतात तर काही सामने बाहेर देखील खेळवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोना विषाणूची जगभरातील परिस्थिती विचारात घेऊनच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले.  

कोरोनाशी असाही लढा, घरमालकाने घरभाडे केले माफ!

यंदाच्या वर्षातील क्रिकेटच्या वेळापत्रकात जुलै-सप्टेंबर या कालावधीत अधिक सामने खेळवण्यात येणार नाहीत. त्यामुळे या स्लॉटमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवण्यासंदर्भात विचार होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खळवण्यात येणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका नियोजित आहे.  १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी आयपीएलचा मुहूर्त लागणार का? हे कोरोनाच्या परिस्थितीवरच ठरेल.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Board of Control for Cricket in India BCCI now eyeing July September window for new IPL 2020 schedule according to Reports