पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ViratBirthdayBlog: विराट एक अदभुत रसायन!

विराट कोहली

जर्सी नंबर १८ चा मैदानातील रूबाब हा परतीच्या पावसापेक्षाही जोरात असतो. भाऊ मैदानात आला की परत जायला मागत नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या खेळीला कोण वैतागतही नाही. सध्याच्या घडीला आपण पावसाने आता थांबावे, अशी मनोमनी याचना करतोय तशीच याचना प्रतिस्पर्धी गोलंदाजाला विराट धावांचा पाऊस पाडू नये, यासाठी करावी लागते. या खेळात तो 'बाप' माणूस आहे आणि भविष्यातही तो असाच आक्रमक राहिल हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज कदापी नाही. 

एमिरेट्स एअरलाइन्समुळे गेलची पंचाईत

त्याच्या आक्रमक खेळीचं नेहमीच स्वागत आहे. पण मैदानातील अति उत्साह त्याच्या नेतृत्वातील परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून जाते. 'क्रिकेट कोड ऑफ कंडक्ट'मध्ये ढगात बघून शिव्या हासाडणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा नियम लागू झाला तर यातही आपला भाऊच अव्वलस्थानी असेल. पण म्हणतात ना कर्तृत्ववान माणूस हुशार असतो. अन्  अशा माणसाच्या चुका दुर्लक्षित करून आपण त्याच्या प्रेमात वाहत जातो. अगदी तो अनुष्काच्या प्रेमात वाहत गेला तसंच...

Video : संघ हरला, पण कार्तिकनं तमाम क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली

काहीवेळा नव्हे तर बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा अट्टाहास (जिद्द) तुम्हाला संपवण्यास पुरेसा असतो. अशावेळी तुम्हाला मानणारी लोकंही तुमच्यावर तोंडसुख घ्यायच सोडत नाहीत. विराट-अनुष्काच्या प्रेम कहाणीत असा प्रकार पाहायला मिळाला आहे. त्याच्या खराब कामगिरीनंतर अनुष्काला ट्रोल करण्यात आलं. एवढच नव्हे तर विराट वेड्या चाहत्यांनी सोशल मिडियात 'विरूष्का'चा बाजार उठवत अनुष्कासोबतच्या प्रेमाला ब्रेक देण्याचा सल्लाही त्याला देऊन टाकला. दोघांच्यातील दुराव्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या.

ICC T20 WC: नव्या पद्धतीने रंगणार सामने, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

जर तुम्ही  विराट-अनुष्काचे बाय हार्ट फॅन असाल तर त्यावेळी दोघांनी सोशल मीडियावर ऐकमेकांना अनफॉलो केल्याचे तुमच्या लक्षात असेल. याकाळात मैदानात नेहमी आक्रमक दिसणाऱ्या विराटमध्ये एक हळवा गडीही दडल्याचे पाहायला मिळाले होते. तो कधी  आपल्या आईसोबतचा एखादा फोटो शेअर करून भावनिक दडपण कमी करायचा. तर कधी तो अनुष्का ज्या मुद्दयावर बोलायची त्यावर व्यक्त होत दोघांच्यातील एकरूपता सिद्ध करायचा. एका बाजूला आयुष्यात उलथापालत सुरू असताना दुसऱ्या बाजूला मैदानात तो १०० टक्केे द्यायचा. वेगवेगळ्या पातळीवरील दडपण पेलून विजयी होणारी माणसं फार दुर्मिळ असतात. कोहली अशाच  रसायनानं भरलेला विजेता आहे. तो जिंकला...जिंकतो  आणि जिंकत राहिल मैदानातही अन् प्रेमातही.


-सुशांत जाधव
sushantjournalist23@gmail.com