पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बर्थडे बॉय मिथुनची हॅट्ट्रिक, शाहरुखचीही शिकार

अभिमन्यू मिथुन

Abhimanyu Mithun hat trick Vijay Hazare Trophy 2019 Final: बंगळुरूच्या के एम चिन्नास्वामी मैदानात सुरु असलेल्या विजय हजारे चषकातील अंतिम सामन्यात कर्नाटकच्या जलदगती गोलंदाज अभिमन्यू मिथुनने तामिळनाडूचा अर्धा संघ तंबूत धाडला. यात त्याने हॅट्ट्रिकची किमया साधली. 

यूरोपीय लीग : युवा एम्बापेनं मोडला मेस्सीचा विक्रम

अभिमन्यूच्या भेदक माऱ्यासमोर तामिळनाडूचा संघाचा डाव निर्धारित ५० षटकातील एक चेंडू शिल्लक असताना २५२ धावांत आटोपला. अभिमन्यू मिथुनचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे बर्थडे बॉयने हॅटट्रिकने सेलिब्रेशन केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडूच्या संघाने दिलेले आव्हान परतवून कर्नाटकचे फलंदाज आपल्या जलदगती गोलंदाजाला विजयी गिफ्ट देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

कर्नाटककडून हॅट्ट्रिकचा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज

२५ ऑक्टोबर १९८९ मध्ये बंगळुरुमध्ये जन्मलेल्या अभिमन्यू मिथुनने अंतिम सामन्यात ९.५ षटकात ३४ धावा खर्च करत अर्धा संघ तंबूत धाडला. ३० वर्षीय अभिमन्यू कर्नाटककडून हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आहे. अभिमन्यूने भारताकडून ५ एकदिवसीय आणि ४ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.  

बांगलादेशचा संघ येईल! गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला

मिथुनने या फलंदाजांना बाद करत नोंदवली हॅट्ट्रिक 
मिथुनने अष्टपैलू शाहरुख खान, एम मोहम्मद आणि मुरगन अश्विनला बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. विशेष म्हणजे तामिळनाडूच्या डावातील अखेरच्या षटकात त्याने हा पराक्रम केला. तिसऱ्या चेंडूवर त्याने २७ धावांवर खेळणाऱ्या एम शाहरुख खानला बाद केले. पांडेने त्याचा झेल टिपला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने मोहम्मद आणि पाचव्या चेंजूवर अश्विनला आल्या पावली माघारी धाडत तामिळनाडूचा खेळ खल्लास केला. यापूर्वी त्याने मुरली विजयला खातेही न उघडू देता माघारी धाडले होते. तर वाशिंग्टन सुंदरला २ धावांवर तंबूत पाठवले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:birthday boy abhimanyu mithun takes hat trick in vijay hazare trophy 2019 final for karnataka against tamil nadu