पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटरचे निधन, मृत्यूच कारण अस्पष्ट!

यष्टीमागे क्षेत्ररक्षण करताना एडवर्ड्स (संग्रहित)

न्यूझीलंडचे माजी क्रिकेटर जॉक एडवर्डस् यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीमागील चपळता ही त्यांच्या खेळ शैलीची खासियत होती. त्यांनी न्यूझीलंडकडून सहा कसोटी सामने आण आठ एकदिवसीय सामने खेळले होते. सेंट्रल डिस्ट्रिक्ट प्रोविन्सने सोमवारी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

देशातील ४०६७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७६ टक्के पुरुष

त्यांच्या निधनाचे नेमके कारण कोणते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एडवर्ड्स यांनी १९७४ से १९८५ दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ६७ सामन्यात सेंट्रल डिस्ट्रिक्ट प्रोविन्स संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. सध्याच्या काळात टी-२० क्रिकेटमध्ये जी फटकेबाजी पाहायला मिळते त्याच अंदाजात ते खेळायचे. एडवर्ड्स यांनी १९७८ मध्ये ऑकलंडच्या मैदानात इंग्लंडविरुदधच्या कसोटी सामन्यात अविस्मरणीय अशी कामगिरी केली होती.

कोविड १९ : न थकता लढत हे मोठ युद्ध जिंकू, मोदींनी व्यक्त केला विश्वास

या सामन्यात त्यांनी दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली होती. एडवर्ड्स यांच्या नावे ८ कसोटीत २५.१३ च्या सरासरीने ३७७  धावांची नोंद आहे.यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्यांनी २३ च्या सरासरीने १३८ धावा केल्या होत्या.