पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : घरामध्ये रंगणार 'बिचुकले की अदालत' हे कार्य

अभिजीत बिचुकले

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल हीना पांचाळ घराबाहेर पडली. आजपासून नवा आठवडा सुरू होणार आहे. हा नवा आठवडा सदस्यांसाठी कसा असेन ? काय काय टास्क रंगतील ? हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉस नेहमीच सदस्यांवर वेगवेगळे टास्क सोपवत असतात. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘बिचुकले की अदालत’ हे कार्य रंगणार आहे. 

कलम ३७० : झायराशी संपर्क तुटल्यानं दिग्दर्शिका सोनाली बोस काळजीत

बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वकीलाची भूमिका निभावणार आहेत. या कार्यात बिचुकले घरातील प्रत्येक सदस्यांवर काही आरोप लावणार आहेत. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहणाऱ्या सदस्यांना आपली बाजू मांडून हे आरोप फेटाळून लावायचे आहेत. बिचुकले हे नेहमीच वादासाठी घरात चर्चेत असतात. जवळपास सगळ्याच सदस्यांशी बिचुकलेंचे खटके उडाले आहेत. त्यामुळे आजच्या 'बिचुकले की अदालत' मध्ये काय होणार, सदस्य बिचुकलेंच्या आरोपांचा सामना कसे करणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे. 

'भूल भुलैया २' या तारखेला होणार प्रदर्शित