Big Bash League: अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद पाठोपाठ पाकिस्तानच्या जलदगती गोलंदाने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (BBL) हॅटट्रिक नोंदवली आहे. मेलबर्न स्टार्सकडून खेळणाऱ्या हॅरिस राउफ बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त फारमात दिसतो. आतापर्यंत या स्पर्धेतील चार सामन्यात त्याने १३ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. सिडनी थंडर्सविरुद्दच्या सामन्यात त्याने मॅथ्यू गिल्क्स, कॅलम फर्गसन आणि डेनियल सॅम्स यांना बाद करत हॅटट्रिकचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला.
Video: हा बाबा वर्ल्डकपमध्ये दमवणार, त्सुनामीची चाहूल देणारी हॅटट्रिक
An iconic BBL moment.
— KFC Big Bash League (@BBL) January 8, 2020
Enjoy Haris Rauf's hat-trick! #BBL09 pic.twitter.com/Qm8iYrIRfA
बीबीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन राउफच्या हॅटट्रिकचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. राउफ आपल्या कामगिरीशिवाय अन्य दोन गोष्टींमुळे चर्चेत आला होता. यापूर्वी त्याने पाच बळी मिळवलेल्या सामन्यातील चेंडू भारतीय सुरक्षा रक्षकास दिल्याचे पाहायला मिळाले होते. या वृत्तानंतर त्याचे खूप कौतुक झाले. तर दुसऱ्या एका घटनेमुळे त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केल्याचेही पाहायला मिळाले. मोठ्याने ओरडून सेलिब्रेशन करण्याच्या त्याच्या अंदाजावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले होते.
पाक गोलंदाज अन् भारतीय सुरक्षा रक्षकाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
हॅटट्रिक नोंदवलेल्या सामन्यात हॅरिसने आपल्या चार षटकांच्या कोट्यात २३ धावा खर्च करुन तीन बळी मिळवले. त्याच्या गोलंदाजीच्या माऱ्यामुळे सिडनी थंडर्सचा संघ निर्धारित २० षटकात पाच बाद १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. फर्गसन ३५, गिल्क्स ४१ आणि सॅम्सला हॅरिसने शून्यावर बाद केले. बीबीएल लीगमधील एकाच दिवसातील ही दुसरी हॅटट्रिक ठरली. यापूर्वी अफगाणिस्तानच्या राशिद खानने अॅडलेड स्ट्राइकर्सकडून खेळता हॅटट्रिकचा पराक्रम केला होता. हॅ याने आतापर्यंत राष्ट्रीय संघाकडून एकही सामना खेळलेला नाही. पण पाकिस्तान लीगमध्ये आपल्या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता तो ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगचे मैदान गाजवताना दिसतोय.