पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पाहा सामन्याला कलाटणी देणारा भुवीचा अप्रतिम झेल

भुवनेश्वर कुमार

India vs West Indies, 2nd ODI: विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना खिशात घालत तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीनंतर क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यातील भुवनेश्वरने अप्रतिम कामगिरी केली. 

विंडीजच्या डावातील ३५ व्या षटकात भुवनेश्वरने भारताला दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. भुवीने ३५ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लयीत दिसणाऱ्या निकोलस पूरनला ४८ धावांवर बाद केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर चेसचा अप्रतिम झेल टिपत त्याने सामना भारताच्या बाजूने फिरवला. चेसने १८ धावांची खेळी केली. या दोघांशिवाय स्फोटक फलंदाज ख्रिस गेलसह रोचलाही भुवीने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ८ षटकात ३१ धावा खर्च करुन ४ बळी मिळवले.

रोहितचा हटके अंदाजातील फोटो होतोय व्हायरल!

पूरन-चेस जोडी तंबूत परतल्यानंतर थोड्याफार अंतराने भारतीय गोलंदाजांनी विंडीजला धक्के देणे सुरुच ठेवले. परिणामी सामना भारताच्या बाजूने झुकला. पावसानंतर खेळाला सुरुवात झाल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजला ४६ षटकात २७० धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र विंडीजचा संघ २१० धावांतच आटोपला. या विजयासाह तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. बुधवारी विंडीज विरुद्धचा तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरले. तर दुसरीकडे कसोटीपूर्वी अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी विंडीज प्रयत्नशील असेल.

WI vs IND 2nd ODI: भारताचा विंडीजवर आणखी एक दमदार विजय

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: bhuvneshwar kumar stunning catch of roston chase in west indies vs india 2nd odi fans vows watch video