पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विराट' रुप पाहून स्टोक्सनं हिटमॅन रोहितला केलं ट्रोल

रोहित शर्मा आणि बेन स्टोक्स

India vs South Africa 2019, 1st Test, Day- 4 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणमच्या मैदानात सुरु असेलल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी रोहित शर्मा (१२७) आणि पुजाराच्या (८१) धावांच्या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर ३९५ धावांचे आव्हान ठेवले आहे. 

'रो'..हिट! शतकासह असा पराक्रम करणारा हिटमॅन पहिलाच फलंदाज

चौथ्या दिवशी भारताच्या डावातील २५ व्या षटकात केशव महाराजच्या चेंडूवर रोहित-पुजारा यांच्यात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे रोहित शर्मा यावेळी पुजारावर भलताच खवळल्याचे पाहायला मिळाले. रोहितने पुजारासाठी वापरलेले शब्द स्टंम्प माईकमध्ये कैद झाल्यानंतर स्टोक्सने रोहितची फिरकी घेतली आहे.

स्टोक्सनं एक ट्विट केले आहे. त्याने लिहलंय की, यावेळी विराट नाही तर चक्क रोहित...."तुम्हाला समजले असेल मला काय म्हणायचंय" स्टोक्सच्या या ट्विटवर अनेक मजेदार प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळत आहे. ़
रोहित हा मैदानावर नेहमीच शांत स्वभावामुळे ओळखला जातो. तो फारसा आपला राग व्यक्त करत नाही. याउलट विराट कोहली हा नेहमीच आक्रमक शैलीत वावरताना दिसते. हा संदर्भ जोडूनच स्टोक्सने रोहितची फिरकी घेतली आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ben Stokes trolls Rohit Sharma and Virat Kohli after hitman cheteshwar pujara chat caught on stump mic see tweet