पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना नव्याने अर्ज करावा लागणार

रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहाय्यक स्टाफसाठी पुन्हा नव्याने अर्ज मागवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयामुळे टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रशिक्षक पदासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ हा वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संपुष्टात येणार आहे.  

रवी शास्त्री यांच्याशिवाय संघासोबत असलेले गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधरन यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यापुरता ४५ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. ३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.  

सध्याच्या घडीला संघासोबत असणारा स्टाफ नव्याने अर्ज दाखल करु शकतात. परंतु संघासाठी नव्या ट्रेनर आणि फिजिओची निवड पक्की मानली जात आहे. कारण शंकर बासु आणि पॅट्रिक फरहार्ट यांनी विश्वचषकातील सेमीफायनलमधील पराभवानंतर पदभार सोडला होता.  

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक वेगवेगळ्या गटात

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. अनिल कुंबळे यांनी चॅम्पियन चषकादरम्यान तडकाफडकी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर २०१७ मध्ये रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ५७ वर्षीय शास्त्री यांनी ऑगस्ट २०१४ ते २०१६ दरम्यान संघाचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

CWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट मंडळाच्या संकेतस्थळावर पुढील दोन दिवसांच्या आता स्टाफ सदस्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. सहाय्यक स्टाफसोबत मुख्य प्रशिक्षकांनाही नव्याने अर्ज करावा लागेल, असे ते म्हणाले. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: bcci will invite fresh applications for sport staff including head coach post ravi shastri has to re apply