पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पॉवर प्ले'नंतर क्रिकेटमध्ये 'पॉवर प्लेयर'ची संकल्पना

आयपीएलमधील रंगत आणखी वाढवण्याचे संकेत

क्रिकेट जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा आणखी रंगतदार करण्याच्या दृष्टिने नवे प्रयोग अवलंबण्यात येणार आहेत. याचाच एक भाग  आगामी हंगामात नवे बदल करण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे. आयपीएलमध्ये 'पॉवर प्लेयर' नियम लागू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत. या नियमानुसार सामन्यादरम्यान गडी बाद झाल्यानंतर किंवा षटक संपल्यानंतर बदली खेळाडूला खेळायला पाठवणे शक्य होणार आहे.  

ICC T20 WC: नव्या पद्धतीने रंगणार सामने, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत या नियमासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.   या नियमाबद्दल ते पुढे म्हणाले की, संघ निवडीवेळी टिम इलेव्हन ऐवजी टिम इलेव्हनची निवड करुन त्यातील एक खेळाडूला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याबाबतचा नियम लागू करावा, अशी आमची संकल्पना आहे.

IND vs BAN: दुसऱ्या सामन्यावर वादळी संकट

आयपीएलमध्ये हा नियम लागू करण्यापूर्वी  आगामी सय्यद मुश्ताक अली चषकात हा नियम लागू करणे फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. हा नियम सामन्याला कलाटणी देणार ठरु शकतो. तसेच या नियमामुळे दोन्ही संघाने वेगळ्यापद्धतीने रणनिती आखण्यासंदर्भात चालना मिळेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.