पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCI चा मोठा निर्णय, IPL मध्ये नो बॉलसाठी 'या' तंत्राचा वापर

नो बॉल संदर्भातील चूक टाळण्याबाबत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार सुरु आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसाआय) आगामी आयपीएलमध्ये काही अमुलाग्र बदल करण्यासाच्या दृष्टिने प्रयत्नशील आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये नो बॉल तपासणीसाठी पंचांना एक नवे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याचा विचार सुरु आहे. या तंत्राचा वापर भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या कोलकाता येथील ऐतिहासिक सामन्यात करण्यात आले होते. हे नवे तंत्रज्ञान आगामी काळातही वापरण्याबाबत बीसीसीआय उत्सुक आहे. 

मातृत्वानंतर सानिया मिर्झा नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज

धावबादचा निर्णय घेण्यासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्याचा उपयोग हा नो बॉलसाठी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मागील आयपीएल हंगामात नो बॉलच्या निर्णयावरुन गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. बऱ्याच सामन्यात पंचांनी नो बॉल असतानाही फलंदाजाला तंबूत परतावे लागले होते. केवळ आयपीएलमध्येच नाही तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेनमध्ये रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही नो बॉलच्या निर्णयावरुन वादंग उठल्याचे पाहायला मिळाले.  

सुवर्ण कामगिरीसह दीपिकाने मिळवला ऑलिम्पिक कोटा

 या सामन्यातील दुसऱ्या दिवसातील सत्रात तब्बल २१ नो बॉल पंचांच्या नजरेतून चुकले होते. बीसीसीआयचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएल स्पर्धेत नो बॉलच्या निर्णयासंदर्भातील वांदग निर्माण होऊ नये, यासाठी अधिकारी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सकारात्मक विचार करत आहेत. उपयुक्त तंत्राचा योग्य वापर व्हावा, यावर आम्ही ठाम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.