पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोहलीच्या पत्रकार परिषदेपूर्वी BCCI ने केली मोठी चूक

विराट कोहली

आयसीसी विश्वचषकातील अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी टीम इंडिया मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. दोनवेळच्या विश्वविजेत्या भारतासमोर विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट करताना बीसीसीआयने एक मोठी चूक केली. 

#INDvsNZ: वर्ल्ड चॅम्पियनसाठी या पाच गोष्टींवर चिंतन करावेच लागेल

बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये एड्रेस (addresses) च्याऐवजी एक्ट्रेस (actress) असा उल्लेख करण्यात आला होता. या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून नेटकरी बीसीसीआयला ट्रोल करत आहेत. चूक लक्षात आल्यानंतर बीसीसीआयने ट्विट डिलीट करत  नवे ट्विट केले. मात्र तरीही नेटकऱ्यांनी बीसीसीआयला चांगलेच फटकारे लगावले.

यंदाच्या विश्वचषकात विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने साखळी सामन्यात कमालीची कामगिरी केली आहे. भारताने यजमान इंग्लंडविरुद्धचा एक सामना गमावला आहे. विशेष म्हणजे साखळी सामन्यात न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघात कोणता संघ भारी कामगिरी करत दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: bcci troll over this mistake before virat kohli press conference for india vs new zealand semi final clash in icc world cup