पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय

बीसीसीआय अधिकाऱ्याने पाक बोर्डाच्या अध्यक्षांना फटकारले

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की त्या त्या स्पर्धेच्या आयोजकांवर ओढावली आहे. आयपीएल स्पर्धेबाबतचा संभ्रम कायम असताना आता भारतीय क्रिकेट बोर्डाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला स्थगिती द्यावी, अशी भूमिका मांडली आहे.  बीसीसीआयने यासंदर्भातील प्रस्ताव आयसीसीसमोर (आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ) ठेवला आहे.   

टीम इंडियाला आम्ही नेहमीच पराभूत करायचो, इम्रान यांचा व्हिडिओ व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतेच्या अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. गुणतालिते भारतीय संघ अव्वलस्थानी असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस पाच सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे.  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट जगतावरही मोठे संकट ओढावले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयसीसी २०२३ पर्यंतच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने यासंदर्भात माहिती दिली होती. आयसीसीच्या १२  पूर्णकालीन सदस्य असणाऱ्या राष्ट्रांसह तीन सहाय्यक प्रतिनिधी देशांनी वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्याला संमती दर्शवली आहे.  

दादा ओरडत असताना कैफ म्हणाला होता की, मी पण खेळायला आलोय!

या बैठकीनंतर बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेलाही स्थगिती द्यावी, अशी सूचना आयसीसीला केली आहे. भविष्यातील क्रिकेट वेळापत्रकाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून ही विनंती करण्यात आहे. आगामी काळातील स्पर्धेच्या वेळापत्रकातील बदलावर आयसीसी विचार करत असले तरी या बैठकीत कोणताही मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसह २०२१  मध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यास प्रयत्नशील आहोत, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.