पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकरच भारतीय क्रिकेटर्स संघटनेची स्थापना होणार

भारतीय क्रिकेटर्ससाठी संघटना

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या हक्क आणि अधिकारासाठी क्रिकेट खेळाडूंची एक स्वतंत्र संघटना लवकरच अस्तित्वात येणार आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यात ही संघटना स्थापनेवर शिक्कामोर्तब होईल. या संघटनेची इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन (आसीए) नावाने यापूर्वीच नोंदणी करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर ही संघटनेला स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. लोढा समितीच्या शिफारीशीमध्ये या संघटनेचा उल्लेख होता.    

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंच्या संघटनेसाठी इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन असे नोंदणीसाठी पाठवण्यात आले आहे. नोंदणी झाल्यानंतर यासंदर्भातील इतर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी आपल्याकडे खेळाडूंची स्वतंत्र संघटना असणे गरजेचे आहे. ही संघटना एखाद्या उप समिती सारखी असेल, असेही ते म्हणाले. 

खेळाडूंच्या संघटनेचे रचनेबद्दल ते म्हणाले की, या संघटनेतील दोन सदस्यांची निवड ही मुख्य परिषदेमध्ये केली जाईल. ही संघटना बीसीसीआयच्या तांत्रिकी समितीपेक्षा वेगळी असेल. खेळाडूंच्या संघटनेसंदर्भातील निर्णयाची सर्व जबाबदारी स्टेअरिंग कमिटीचे सदस्य कपिल देव, भरत रेड्डी, अंशुमान गायकवाड आणि पूर्व कप्तान शांता रंगास्वामी यांच्याकडे असणार आहे.