पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानी खेळाडूंना आशिया XI मध्ये 'नो एंट्री'

पाकिस्तानी खेळाडूंना आशिया XI 'नो एंट्री'

बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) बांगलादेशचे संस्थापक आणि 'बंगबंधू' नावाने प्रसिद्ध शेख मुजीबूर रहमान यांची जन्मशताब्दी साजरा करणार आहे. त्यानिमित्त ते मार्चमध्ये आशिया एकादश आणि विश्व एकादशदरम्यान दोन टी-२० सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. आयसीसीने या सामन्यांना अधिकृत दर्जा दिला आहे, असे सांगितले जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहता या सामन्यात एकाही पाकिस्तानी खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे.

इंग्लंडच्या 'द क्रिकेटर' मासिकातही विराट ठरला या दशकातील राजा

बीसीसीआयचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी 'आयएएनएस'शी बोलताना म्हटले की, पाकिस्तानी खेळाडूंना आमंत्रित केले जाणार नाही. दोन्ही देशातील खेळाडूंचे एकत्रित येणे किंवा एकमेकांना निवडण्याचा कोणताच प्रश्न नाही. सौरव गांगुली त्या पाच खेळाडूंचा निर्णय घेतील जो आशिया एकादशचा हिस्सा असेल. 

नेटकऱ्यांच्या नजरेत या दशकातील बादशहा ओन्ली MSD!

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी भारताची सुरक्षा स्थिती पाकिस्तानपेक्षा खराब असल्याचे वक्तव्य केल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी चिघळला आहे. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक रशीद लतीफ यांनी चार देशांच्या प्रस्तावित मालिकेबाबतच्या सौरभ गांगुलींची कल्पना तकलादू असल्याचे म्हटले होते.

बुमराहसाठी दादानं प्रोटोकॉल ठेवला बाजूला