पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एमएसके प्रसाद यांनी रायडूबद्दल बाळगलेले मौन अखेर सोडले

अंबाती रायडू आणि एमएसके प्रसाद

इंग्लंडमधील मागील वर्षी झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत अंबाती रायडूला संधी न दिल्याने चांगलाच वाद रंगला होता. चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची उणीव भरुन काढण्यासाठी निवड समिती अंबाती रायडूला संधी देईल, अशी चर्चा रंगली. पण ऐनवेळी विजय शंकरला संघात स्थान देत बीसीसीआय निवड समितीने सर्वांनाच धक्का दिला. निवड समितीच्या या निर्णयावर खुद्द अंबाती रायडूने नाराजी व्यक्त केली. रायडूच्या राजीनाम्याचे नाट्यही पाहायला मिळाले. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र  चौथ्या क्रमांकाच्या डोकेदुखीमुळे टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधूरे राहिल्याची चर्चाही रंगली. मात्र निवड समितीने रायडूला नेमके का वगळले? हा प्रश्न आतापर्यंत अनुत्तरितच होता. 

NZvsIND : टेलरचा शतकी ट्रेलर! वनडेत किवींच्या जिवात जीव...

बीसीसीआय निवड समितीचे मावळते अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रायडूसंदर्भात भाष्य केले आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रायडूचा समावेश झाला नाही याचे मलाही दुख वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखतीत एमएसके प्रसाद म्हणाले की, २०१९ मध्ये रायडू चांगली कामगिरी करत होता. आम्ही त्याच्या फिटनेसवरही लक्ष ठेवले होते. पण त्याला विश्वचषकावेळी संघात स्थान मिळाले नाही. त्याला संघात बाहेर ठेवण्याचा निर्णय  फार कठीण होता, असेही त्यांनी सांगितले. 

Video : कोहलीने घेतलेल्या या विकेटची चर्चा तर होणारच!

ते पुढे म्हणाले की, आम्ही त्याला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर एकदिवसीय संघात स्थान दिले होते. २०१६ मध्ये झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यापासून त्याने कसोटीवर लक्षकेंद्रीत करण्याबाबत निवड समिती आग्रही होती. यासंदर्भात रायडूशी चर्चाही केली होती. विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिने आम्ही त्याच्या फिटनेसवरही भर दिला. पण अखेरच्या क्षणी त्याला संघात घेता आले नाही. 

...म्हणून पहिलं वहिलं शतक अय्यरसह संघासाठीही 'स्पेशल'

रायडूने भारतासाठी ५५ एकदिवसीय सामने खेळले असून यात त्याने ४७.०६ च्या सरासरीसह ७९.०५ च्या स्ट्राइकरेटने १ हजार ६९४ धावा केल्या आहेत. यात त्याने तीन  शकतकांचा समावेश आहे. रायडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. या मालिकेत त्याने केवळ ३३ धावा केल्या होत्या.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bcci s former chief selector MSK Prasad reveals the reason behind Ambati Rayudu s omission from Indian team during 2019 icc world cup