पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी २ हजार अर्ज

विराट कोहली आणि रवी शास्त्री

बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासह साहाय्यक स्टाफ पदासाठीच्या जाहिरातीला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 'बंगळुरु मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी जवळपास २ हजार उमेदवार इच्छुक आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू आणि प्रशिक्षणाचा तगडा अनुभव असणारे टॉम मूडी यांनी देखील मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे.

विडींज दौऱ्यासाठी भारतीय संघाला मिळाला नवा ट्रेनर

याशिवाय न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आणि आयपीएलमध्ये किंग इलेव्हन पंजाबला मार्गदर्शन करत असलेल्या माईक हसेन यांनीही अर्ज केला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर महिला जयवर्धनेनं यापूर्वी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धूरा सांभळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याने यावेळी अर्ज केला नसल्याचे वृत्तात म्हटले आहे. 

प्रशिक्षक निवडीसंदर्भात मत मांडण्याचा विराटला अधिकार : गांगुली

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी ऱ्होड्स यांनीही अर्ज दाखल केला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर सध्याच्या टीम स्टाफसोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर विंडीज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना ४५ अवधी वाढवून देण्यात आला होता. भारतीय क्रिकेट संघासोबतच्या स्टाफमधील वेगवेगळ्या पदासाठी आलेल्या अर्जाचा विचार करुन ठराविक नावांची यादी (शॉर्ट लिस्टेट) तयार केली जाईल.

त्यानंतर मुलाखतीच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे  बीसीसीआयच्या नव्या सल्लागार समितीचे सदस्य अंशुमान गायकवाड यांनी म्हटले आहे. बीसीसीआयने स्टाफ नियुक्तीसंदर्भातील जाहिरात दिल्यानंतर रवी शास्त्रींना पुन्हा संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत या  तगड्या परदेशी नावांचा समावेश झाल्यानंतर बीसीसीआय नक्की कोणाला पसंती देणार