पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई

पृथ्वी शॉ

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉवला बीसीसीआयने तब्बल आठ महिन्यासाठी निलंबित केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील पृथ्वी शॉची नोंदणी आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे पृथ्वी शॉवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याला मैदानात परतण्यासाठी आणखी काही महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

..म्हणून विराट विश्रांती विना विंडीज दौऱ्यासाठी सज्ज

डोपिंग चाचणी दरम्यान पृथ्वी शॉ दोषी आढळला आहे. चाचणी नमुन्यामध्ये जो पदार्थ आढळला आहे तो सामान्यता खोकल्याच्या औषधात आढळतो. पृथ्वीने अनावधानाने औषधाच्या माध्यमातून या पदार्थाचे सेवन केले असले तरी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे. बीसीसीआयच्या अँटी डोपिंग टेस्टिंग प्रोग्रामचा भाग म्हणून संघाती प्रत्येकाला डोपिंग चाचणीला सामोरे जावे लागते. पृथ्वी शॉची फेब्रुवारीमध्येही चाचणी घेण्यात आली होती. त्याच्या यूरिन सँम्पलमध्ये टर्बुटालिन हा प्रतिबंधित पदार्थ आढळून आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BCCI Prithvi Shaw registered with Mumbai Cricket Association has been suspended for a doping violation for 8 month