चीनमधील कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतामध्ये याची दहशत निर्माण झाली आहे. १३ व्या हंगामातील आयपीएल स्पर्धेवरही कोरोनाचे सावट दिसत आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये काही बदल होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे.
Video : आयसीसीच्या या ट्विटमुळे सुरु झाली लग्नाची चर्चा!
गांगुली म्हणाले की, आयपीएल स्पर्धा ही नियोजनानुसारच होईल. वेगावे प्रसार होत असलेल्या कोरोना व्हायरससंदर्भात योग्य त्या उपाय योजना करण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. २९ मार्चपासून क्रिकेट जगतातील लोकप्रिय आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहेत. या स्पर्धेत भारतासह परदेशी खेळाडूंचा सहभाग आहे.
कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची शक्यता?
काउंटीतील संघ अबुधाबी, युएई याठिकाणी दौरे करताना दिसत आहेत. या संघाना दौऱ्यादरम्यान कोणतीही समस्या निर्माण झाल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळेच आयपीएल स्पर्धेवरही कोरोनाचा मोठा प्रभाव जाणवणार नाही, अशी आशा गांगुली यांनी व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेसाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असेही गांगुली यांनी म्हटले आहे.