गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्याचे काम सुरु आहे. या स्टेडियमचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला हे स्टेडियम सामना खेळवण्याच्या दृष्टीने सज्ज होईल, असे वृत्त आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनप्रसंगी याठिकाणी रोमहर्षक आणि उत्सुकता वाढविणारा सामना खेळवण्याचा मानस बीसीसीआयने ठेवला आहे.
फेडररची प्रतिमा आणखी उजळली, सन्मानार्थ स्विसच्या नाण्यावर कोरले चित्र
The world’s largest cricket stadium at Ahmedabad with a capacity to host 1.10 lakh fans is likely to be ready to host its first match by March. The new Sardar Patel stadium can seat more fans than Australia’s Melbourne Cricket Ground which has capacity of just over a lakh. pic.twitter.com/0DnFNoicGp
— Gujarat Information (@InfoGujarat) December 2, 2019
अहमदाबादमध्ये पुनर्बांधनी करण्यात येणाऱ्या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने या मैदानात अभूतपूर्व सामना खेळवण्याबाबतचे संकेत दिले आहेत. आयसीसीची मान्यता मिळाल्यास मार्चमध्ये वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध आशियाई इलेव्हन यांच्यातील सामन्याने या स्टेडियमचे उद्घाटन करण्यास बीसीसीआय प्रयत्नशील आहे. भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने यांसदर्भातील एक प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला पाठवला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) वर जवळपास १ लाख प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे. सध्याच्या घडीला हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.
रणजी ट्रॉफी : मुंबई संघाची घोषणा, पृथ्वीसह अजिंक्यच्या नावाचाही समावेश
गुजरातमधील मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर १९८२ पासून आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. तर २४ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहे. या स्टेडियमला आता दिमाखदार आणि भव्य रुप देण्याचे काम सुरु आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशन या स्टेडियमचा कायापालट करणार आहे. ६३ एक्कर जागेत असलेल्या या स्टेडियमसाठी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.