पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वप्नातील संकल्प सिद्धीसाठी 'दादा' इंग्लंड दौऱ्यावर

सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली इंग्लंड दौऱ्यावर आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी त्यांची अनौपचारिक बैठक होणार आहे. या बैठकीला आस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गांगुली यांच्या या दौऱ्यामध्ये चार देशांचा सहभाग असणाऱ्या मालिकेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयमध्ये नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत. पिंक बॉल टेस्टनंतर गांगुली यांनी चार देशांचा समावेश असणारी मालिका खेळवण्याचा मानस बोलून दाखवला आहे. आपल्या याच संकल्पासाठी ते इंग्लंडला रवाना झाल्याची चर्चा आहे.    

IPL : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, जोफ्राची स्पर्धेतून माघार

आयएएनएसने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, सौरव गांगुली  बुधवारी कोलकाताहून इंग्लंडला रवाना झाले आहेत. याठिकाणी ते इंग्लंड आणि वेल्स बोर्डातील अधिकाऱ्यांसोबतच्या एका बैठकीला उपस्थिती लावणार आहेत. या बैठकीसंदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नसली तरी चार देशांची एकत्रित मालिकेचा प्रयोगाबद्दल बैठकीत विचार विनमय होणार आहे. ऑस्ट्रेलिय क्रिकेट बोर्डाचे अधिकारीही बैठकीला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. चार देशांच्या एकत्रित  मालिकेचा प्रयोग कसा राबवता येईल? आयसीसीच्या भविष्यातील स्पर्धेत त्याला सामावून घेता येईल का? यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर मार्ग काढण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

मास्टर ब्लास्टर सचिन दिल्ली मॅरेथॉनसाठी सज्ज

दरवर्षी चार देशांचा सहभाग असणाऱ्या मालिकेच आयोजन करण्याबाबत बीसीसीआय विचार करत असल्याचे गांगुली यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. यात भारत, ऑस्ट्रेलिया  आणि इंग्लंडसह आयसीसीच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या देशाचा सहभाग असणार आहे. यासंदर्भात बीसीसीआय आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याशी चर्चाही केली होती. ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधइकारी केविन रोबर्टस यांनी देखील या प्रयोगाबद्दल सकारात्मकता दाखवली होती. गांगुली अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नवा विचार क्रिकेटमध्ये येत आहे, असेही रोबर्टस यांनी म्हटले होते.