भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेतील सलामीचा सामना दिल्लीच्या मैदानात नियोजित आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे हा सामना नियोजनानुसार होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होईल, असे गांगली यांनी स्पष्ट केले आहे.
'दादा'सोबत सेल्फी काढण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची गर्दी
३ नोव्हेंबर रोजी होणारा पहिला सामना दिल्लीबाहेर खेळण्याचा निर्णय घ्यावा अशी चर्चा होती. यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्रही लिहिलं होते. मात्र हा सामना दिल्लीतच होईल असे दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए)च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. बीसीसीआयकडून आम्हाला यासंदर्भात कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे डीडीसीने म्हटले होते. सौरव गांगुली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
क्रिकेटपेक्षा प्रदूषणाची चिंता करायला हवी,'गंभीर' प्रतिक्रिया
एएनआयच्या वृत्तानुसार, सौरव गांगुली म्हणाले की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना ठरल्याप्रमाणे दिल्लीच्या मैदानातच खेळवण्यात येईल. यापूर्वी भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. दिल्ली वासियांनी क्रिकेट सामन्याच्या आयोजनापेक्षा प्रदूषणाची चिंता करायला हवी. प्रदूषण हे केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर शहरातील नागरिकांसाठी धोकादायक असल्याचा उल्लेख त्याने केला होता.
'धक्काधक्की'त बांगलादेशचा संघ दिल्लीत दाखल
उल्लेखनिय आहे की, बांगलादेशचा संघ तीन टी-२० आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. ३ नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली (पूर्वीचे फिरोजशहा कोटला) स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दिवाळीनंतर प्रदूषणामध्ये झालेली वाढ सामन्यात व्यत्यय आणेल असे चित्र दिसत असताना गांगुली यांच्या वक्तव्याने या सामन्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासा देणारी आहे.