पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCI ने या फ्रेममधून दिले धोनीवरील प्रेम कमी झाल्याचे संकेत

महेंद्रसिंह धोनी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आणखी एक धक्का दिलाय. शुक्रवारी बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील फोलोअर्सच्या आकड्याने १ कोटी १० लाखचा टप्पा पार केल्यानंतर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत. पण चाहत्यांचे आभार मानणाऱ्या फ्रेममधून धोनीवरील बीसीसीआये आपले प्रेम कमी झाल्याचे दाखवून दिले आहे. पोस्टरमध्ये महिला क्रिकेटला स्थान मिळाले मात्र धोनीकडे कानाडोळा करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कदाचित धोनीचा करारबद्ध खेळाडूंच्या यादीत समावेश नसल्यामुळेच त्याला पोस्टरमध्ये स्थान मिळाले नसावे. 

COVID-19 अंतर ठेवायच म्हणजे त्यांना समाजातून आऊट करायचय नाही: सचिन

बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर फोलोअर्सचा आकडा हा १ कोटी १० लाखपेक्षा अधिक झाला आहे. बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील प्रमुख ८ खेळाडूंना आपल्या पोस्टरमध्ये स्थान दिले आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. बीसीसीआयने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की 'आम्ही ट्विटरवरील आमच्याशी जोडलेल्या मंडळींचे खूप खूप आभारी आहोत. आपल्यात अंतर निर्माण होणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा' 

कोरोना: तुटपुंज्या मदतीवरुन धोनीला ट्रोल करणाऱ्यांवर साक्षी भडकली

यापूर्वी बीसीसीआयने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटवर १ कोटी ३० लाख फोलोअर्स झाल्यानंतरही चाहत्यांचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले होते. या पोस्टरमध्येही धोनीला स्थान मिळाले नव्हते. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापासून धोनी भारतीय संघात दिसलेला नाही. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीने तो आगामी टी-२० विश्वचषका पदार्पण करेल, अशी चर्चा रंगली होती. पण आयपीएलसह आगामी विश्वचषक स्पर्धेवर कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे धोनीच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालल्याचे चित्र गडद होताना दिसते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A 13 Million strong family 🙏🙏 Thank you for your love and support 💙💙

A post shared by Team India (@indiancricketteam) on