पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहितकडे वनडे अन् कोहलीकडे कसोटी नेतृत्वाच्या प्रयोगाचे संकेत

विराट कोहली आणि रोहित शर्मा

विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वामध्ये विभागणी होण्याची चर्चा जोर धरु लागली आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ हा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर आता बीसीसीआय भारतीय संघासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यात संघासंदर्भातील  नेतृत्वासंदर्भातील महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहे.  

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक वेगवेगळ्या गटात

आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, आगामी मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे विभागून कर्णधारपद देण्याबाबत  बीसीसीआय चर्चा करणार आहे. रोहितकडे एकदिवसीय कर्णधारपद आणि कोहलीकडे कसोटीचे नेतृत्व या संबंधी विचार केला जाऊ शकतो. 

इंग्लंडला चॅम्पियन ठरवण्याच्या निकषावर वादंगाचे सावट

रोहित शर्मासाठी मर्यादित षटकांच्या सामन्यातील नेतृत्वाची धूरा देण्याची ही योग्य वेळ आहे. पुढील विश्वचषकाच्या दृष्टिने भारतीय संघासाठी ते फायदेशीर ठरेल, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. बीसीसीआयच्या बैठकीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुफीळी निर्माण झाल्याच्या अफवेसंदर्भात विशेष चर्चा केली जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: bcci mulling split captaincy between virat kohli and rohit sharma after icc world cup 2019 defeat in semi finals