पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL च्या वेळेत मोठा बदल होण्याची शक्यता, आज होणार निर्णय

आयपीएल

आयपीएलची नियामक समिती आगामी हंगामासाठी रात्रीच्या सामन्यांची वेळ आठऐवजी ७.३० वाजता करण्यासंदर्भात सोमवारी चर्चा करणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सरचिटणीस जय शहा यांच्यासह बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीलाही (सीएसी) अंतिम रुप देण्याची अपेक्षा आहे. हीच समिती राष्ट्रीय निवड समितीच्या उमेदवारांची मुलाखत घेईल. 

सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट आणि मुलीचा अपघाती मृत्यू

गौतम गंभीर आणि सुलक्षणा नाईक लोढा समितीच्या शिफारशींनुसार सीएसीमध्ये स्थान मिळवण्यास अपात्र असल्याचे सांगण्यात येते. गंभीरने २०१८-१९ मध्ये निवृत्ती घेतली. त्यानंतर तो खासदारही आहे. 

सुरक्षणा नाईकनेही २०१८-१९ मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. सीएसीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी सक्रिय क्रिकेटमधून किमान पाच वर्षांपूर्वी निवृत्ती घेणे आवश्यक आहे. माजी कसोटी क्रिकेटपटू बृजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली आयपीएल संचालन परिषदेची दुसरी बैठक होणार आहे. यामध्ये २०२० सत्राच्या कार्यक्रमांना अंतिम रुप दिले जाण्याची शक्यता आहे. 

NZvIND T20: राहुल-श्रेयसची पुन्हा कमाल, भारताचा दुसरा विजय

लोढा समितीच्या शिफारशींनुसार आयपीएल फायनल आणि भारताच्या पुढील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान १५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सदस्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर 'पीटीआय'ला सांगितले की, प्रसारकर्त्यांना लवकर (सात किंवा साडेसात वाजता) मॅच सुरु व्हावी असे वाटते. त्याचबरोबर आठवड्यात दोन सामने होऊ नयेत. या मुद्द्यावर चर्चा होईल. संचालन परिषदेच्या बैठकीत संपूर्ण कार्यक्रमावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

सचिनचा गोलंदाजीतील हा विक्रम तुम्हाला माहितेय का?

आणखी एक दुसरा मुद्दा म्हणजे गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियम आयपीएल स्थळ म्हणून पदार्पण करत आहे. राजस्थान रॉयलचे हे गृहमैदान असेल. त्याचबरोबर २०२१ च्या सत्रात टीमच्या संख्येवरही चर्चा होऊ शकते. आयपीएलमध्ये आणखी दोन फ्रंचायजी जोडून ही संख्या १० पर्यंत नेणे आणि ही स्पर्धा दोन महिन्यांहून अधिक काळ करण्याची मागणी केली जात आहे.