पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुखापतीतून रोहित शर्मा फिट है बॉस!

रोहित शर्मा

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी सरावादरम्यान कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नसून तो रविवारी मैदानात उतरणार असल्याचे बीसीसीआयच्या मेडिकल टीमने स्पष्ट केले. नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना डाव्या बाजूला पोटावर चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली होती.

टी-२० मालिकेत वॉर्नरला बाद करणं लंकेला जमलं नाही

चेंडू लागल्यानंतर रोहितने मैदान सोडले होते. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बांगलादेश आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारी ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे.  

बीसीसीआयच्या निर्णयावर दिया मिर्झाचा संतप्त सवाल

या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती दिली असून भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही रोहित शर्माच्या खांद्यावर असेल. विश्वचषकातील निराशजनक कामगिरीनंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विंडिज दौऱ्यात कमालीची कामगिरी केली होती. याशिवाय नुकत्याच झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेतही निर्विवाद यश मिळवले होते. बांगलादेशचा संघ हा क्रिकेटच्या मैदानात उलथापालथ करण्याची क्षमता असणारा संघ आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणतीही जोखीम न उचलता विजयाची मालिका कायम राखण्याच्या इराद्याने रोहितच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BCCI medical team has confirmed that Rohit Sharma is fit and available for the first T20 against Bangladesh after injury