भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी सचिन तेंडुलकरवरील दुहेरी हितसंबंध प्रकरणातील आरोप फेटाळून लावला आहे. दिग्गज क्रिकेटरने सल्लागार समितीमध्ये काम करणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे सांगत त्यांनी सचिनवरील ओराप फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले.
सचिन-लक्ष्मण १४ तारखेला BCCI लवादासमोर हजर होणार
जैन यांनी आपल्या निर्णयावेळी म्हटले की, सचिन तेंडुलकर सध्याच्या घडीला सल्लागार समितीचा सदस्य मानत नाही. तसेच तो या समितीमध्ये काम करणार नाही. त्यामुळे वर्तमान तक्रार निरर्थक ठरते. जैन म्हणाले की, तेंडुलकरने वकील अमित सिब्बल यांच्या मार्फत स्पष्टिकरण दिले आहे. सचिनवरील आरोप निर्थक घोषीत करण्यासाठी हे स्पष्टीकरण पुरेसे आहे. बीसीसीआयने सल्लागार समितीच्या कार्यक्षेत्रासंदर्भातील अटी आणि भूमिका स्पष्ट केली नाही तर सचिन विश्वचषकानंतर प्रशिक्षकपदाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही, असेही जैन यांनी म्हटले आहे.
सचिन म्हणतो मी लाभार्थी नाही!
दुहेरी हितसंबंधाच्या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांच्याकडून नोटीस बजावण्यात आली होती. सल्लागार समितीचे सदस्य असताना सचिन आणि लक्ष्मण आयपीएलमधील संघासोबत कार्यरत असल्याचे सांगत मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजीव गुप्ता यांनी या दोघांवर हिससंबंध प्रकरणातील तक्रार दाखल केली होती.