पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हरमनप्रीत, स्मृतीला ए श्रेणी तर मिताली, झुलनला बी श्रेणीत स्थान

बीसीसीआयने भारतीय महिला संघातील खेळाडूंशीसोबतचा करारही जाहीर केला.

भारतीय क्रिकेट मंडळाने गुरुवारी २०१९-२० च्या हंगासाठी पुरुष भारतीय संघासोबतच भारतीय महिला संघासोबतचा करारसंदर्भातील देखील घोषणा केली. महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंची ए, बी आणि सी अशी वर्गवारी करण्यात आली असून टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, धडाकेबाज सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणि पुनम यादव यांना ए श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजला बी श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.   

BCCI च्या करारातून धोनी आउट! कोहली, रोहित अन् बुमराह A+ श्रेणीत

ए श्रेणीतील महिला खेळाडूंना प्रत्येकी ५०-५० लाख, बी, श्रेणीतल महिलांना प्रत्येकी ३०-३० लाख तर सी श्रेणीतील महिला खेळाडूंना प्रत्येकी १०-१० लाख रुपये मानधनाची तरतूद आहे. बी श्रेणीत मिताली राजसह क्रिकेट जगतात आपल्या वेगवान गोलंदाजीने दबदबा निर्माण करणाऱ्या झुलन गोस्वामी हिचा देखील समावेश आहे. यांच्याशिवाय एकता बिष्ट, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमायमा रॉड्रीग्ज आणि तानिया भाटीया हिचा समावेश आहे. 

टी-२० वर्ल्ड कपसाठी महिला ब्रिगेडची घोषणा, १५ वर्षाच्या मुलीलाही संधी

वेदा कृष्णमूर्ती, पुनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूडजा वस्त्राकर, हरलीन देओल, प्रिया पुनिया आणि शेफाली वर्मा यांना सी श्रेणीत स्थान मिळाले आहे. पुरुष संघातून धोनीला बाहेर ठेवून धक्का देणाऱ्या बीसीसीआयने महिला क्रिकेट संघातून झुलन गोस्वामी आणि टी-२० तून निवृत्ती जाहीर केलेल्या मिताली राजला बी श्रेणीत ठेवत धक्का दिला आहे.  महिला क्रिकेट संघातील पुनम यादवला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून गौरवण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. तिची अपेक्षेप्रमाणे ए श्रेणीत वर्णा झाली आहे. तिच्याप्रमाणे महिला क्रिकेट संघातील शेफाली वर्माला उद्योत्मुक महिला खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. शेफालीने मागील वर्षात ९ टी-२० सामन्यात २२२ धावा केल्या आहेत. तिला सी श्रेणीत मिळालेल्या स्थानावरच समाधान मानावे लागणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BCCI contracts list Mithali Raj dropped to Grade B shefali verma gets reward for good performance