भारतीय क्रिकेट मंडळाने वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली. यात भारतीय पुरुष संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठित अशा पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला क्रिकेट संघातील पुनम यादवला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून गौरवण्यात येणार आहे. २०१८-१९ या वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर बुमराहला बीसीसीआयचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयकडून दिल्या जाणाऱ्या यंदाच्या यादीत कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान देण्यात आलेले नाही.
सोशल मीडियावर मुंबईकर अंजिक्य-सचिन अन् वडा पावची चर्चा!
बुमराहने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ५ बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा बुमराह आशियातील एकमेव गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत २-१ अशा ऐतिहासिक विजयात मोलाची कामगिरी बजावली होती.
शेफाली वर्माचाही सन्मान
महिला क्रिकेट संघातील शेफाली वर्माला उद्योत्मुक महिला खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. शेफालीने मागील वर्षात ९ टी-२० सामन्यात २२२ धावा केल्या आहेत. याशिवाय २०१८-१९ या वर्षांत कनिष्ठ गटातील सर्वोत्तम कागिरीबद्दल तिला जगमोहन दालमिया पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात येणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील ४६ सामन्यात तिने ७ शतकं आणि ५ अर्धशतकाच्या जोरावर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार ९२३ धावा केल्या आहेत.
फिंच म्हणाला, विराटच्या वाघांना रोखणं 'मुश्किल', पण ...
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या पुरस्कारासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, वेगवेगळ्या गटातील खेळाडूंना सन्मानित करण्याची बीसीसीआयची परंपरा आहे. मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बीसीसीआयकडून पुरस्कार जाहीर करण्यात येतात. माजी क्रिकेटर्सचा देखील योग्य सन्मान करण्यात येईल, असेही गांगुली यांनी म्हटले आहे.