बीसीसीआयने नव्या वर्षातील वरिष्ठ संघाच्या खेळाडूंसोबतच्या नवा कराराची घोषणा केली आहे. या करारामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना अ+ (A+) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. फिरकीपटू आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत या खेळाडूंना अ (A) श्रेणीत स्थान मिळाले आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही म्हणाल पोरानं धोनीची डिक्टो कॉपी केली
आक्टोंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंतच्या करारात धोनीच नाव मात्र दिसत नाही. विश्वचषकापासून महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून दूर आहे. निवृत्तीबाबत किंवा पुनरागमनाबाबत त्याने कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळेच या करारामधून त्याला स्थान गमवावे लागले असल्याची शक्यता आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन प्रसिद्ध केलेल्या यादीत धोनीच्या नावाचा उल्लेख दिसत नाही. याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
टीम इंडियाच्या 'सुपर फॅन' चारुलता आजींचं निधन
बीसीसीआच्या अ+ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी वार्षिक मानधन दिले जाते. अ (A) श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब (B) श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी तर क (C) श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी इतके मानधन दिले जाते. ब (B) श्रेणीत एकूण पाच खेळाडूंचा समावेश असून यात वृद्धिमान साह, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल यांचा समोवेश असून क गटात केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चाहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि वाशिंग्टन सुंदर या खेळाडूंचा समावेश आहे.