दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात रंगणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. विडींज दौऱ्यातून माघार घेणाऱ्या धोनीला संघात स्थान मिळालेले नसून विश्रांतीनंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन झाले आहे.
WI vs IND : पंत की साहा? चर्चेवर गंभीर यांच परखड मत
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंह धोनी ऐवजी बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंतलाच पहिली पसंती दिली आहे. याशिवाय जलगती गोलंदाज जसप्रीप बुमराहाला विश्रांती देण्यात आली आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना धर्मशाळा मैदानात रंगणार असून १८ सप्टेंबरमध्ये दुसरा सामना मोहालीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २२ सप्टेंबर रोजी बंगळुरुच्या मैदानात या मालिकेतील शेवटचा सामना खेळवण्यात येईल.
भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांड्ये, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंगटन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी