पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video :धडपडत धाव पूर्ण केली, पण रिटायर हर्ट होऊन रुग्णालयात पोहचला

बीबीएल सामन्यातील घटना

क्रिकेटच्या मैदानात संघाच्या धावसंख्येत भर घालण्याची धावपळ सुरु असताना अनेक अफलातून क्षण अनुभवायला मिळतात. कोणताही फलंदाज धाव घेताना बाद होऊ नये याची खबरदारी घेत यशस्वीपणे धाव पूर्ण करण्यास प्रयत्नशील असतो. अनेकदा डाइव्ह मारुन फलंदाज धावपूर्ण करताना दिसते. काहीवेळा फलंदाज यशस्वी ठरतो. तर काहीवेळा क्षेत्ररक्षक बाजी मारुन जातो. बिग बॅश लिगमधील एका सामन्यात अनोखा क्षण अनुभवायला मिळाला. एका सामन्यादरम्यान आपली विकेट वाचवण्यासाठी फलंदाजाने थरारक प्रयत्न केला. यात फलंदाज गोलंदाजाला धडकून खाली कोसळून जब्बर जखमी झाला. तंबूत जाऊ नये म्हणून केलेल्या धडपडीने त्याला रुग्णालयात पोहचवले.    

Under-19 World Cup : स्पर्धेत निच्चांकी धावसंख्येसह लाजिरवाणा विक्रम

मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेंस यांच्यातील सामन्यात हा सर्व प्रकार घडला. डोकलँड्स स्टेडियममध्ये मेलबर्न संघाचा सॅम हार्पर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने नाथन एलिसच्या गोलंदाजीवर फटका लगावल्यानंतर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. आपण क्रिजमध्ये सुरक्षित पोहचणार नाही, याची चिंता वाटल्यानंतर त्याने डाइव्ह मारली ती थेट गोलंदाजाच्या अंगावर.   

गंभीर स्ट्रोक : हा बॅकअप मॅन पंतचं पॅकअप करु शकतो

या धडकेनंतर हार्पर मैदानात जोरात कोसळला. तो क्रिजमध्ये पोहला पण सुरक्षित नाही तर जखमी होऊन. त्याच्या वेदना पाहून स्टाफ डॉक्टरला मैदानात यावे लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बाहेर न्यावे लागले. या घटनेमुळे हार्परला अवघ्या ६ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन परतावे लागले. बीबीएलच्या ट्विटरवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हार्परला रुग्णायात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

INDvNZ: खंदा फलंदाज खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार

या सामन्यात होबार्ट हरिकेंस संघाने ४ धावांनी विजय मिळवला. होबार्टने मॅकेलिस्टर राइट (७०*) आणि मॅथ्यू वेड (६६) धावांच्या जोरावर ३ बाद १९० धावा केल्या होत्या. मेलबर्न संघाला निर्धारित २० षटकात ४ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारता आली.  मेलबर्नकडून शॉन मार्श (५६), मोहम्मद नबी (६३) आणि वेब्स्टर (५०)  धावांची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.