ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-२० लीगमध्ये होबार्टचा कर्णधार मॅथ्यू वेड याचा दोन क्षेत्ररक्षकांनी सुरेख ताळमेळ दाखवत घेतलेला झेल सध्या चर्चेत आहे. मॅथ्यू हेडला बाद करण्याच्या पंचांच्या निर्णयाला मेलबर्न क्रिकेट असोसिएशनने योग्य म्हटले आहे. मात्र सोशल मीडियावर हा निकाल संभ्रमात टाकणारा असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.
Matthew Wade has to go after this spectacular effort from Matt Renshaw that will lead to plenty of debate about the Laws of Cricket! #BBL09 pic.twitter.com/wGEN8BtF5u
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2020
लंकेच्या खेळाडूने शेअर केला पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा व्हिडिओ
प्रथम फलंदाजी करणाऱ्या होबार्ट संघाने १४.४ षटकात अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर मॅथ्यू वेडच्या फलंदाजीच्या जोरावर ९८ धावा धावफलकावर लावल्या होत्या. वेड ६१ धावांवर धुवांधार फलंदाजी करत असताना त्याने लॉग ऑनच्या दिशेने टोलवलेला उत्तुंग फटका क्षेत्ररक्षकांनी सीमारेषेवर अप्रतिमरित्या पकडत मेथ्यूला तंबूचा रस्ता दाखवला. ब्रिस्बेनच्यामॅट रेनशॉने सीमारेषेवर क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम नजारा दाखवून दिला. कमालीचे संतुलन दाखवत त्याने सीमारेषेच्या बाहेर पकडलेला चेंडू आपल्या सहकाऱ्याकडे फेकला.
IndvsSL: पुण्याच्या मैदानात कोहलीसमोर असेल हे 'विराट' चॅलेंज
टॉम बँटनने त्याला सुरेख साथ दिली. या जोडीच्या कसरतीचा क्षण पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी मॅथ्यू वेड बाद असल्याचे जाहीर केले. वेडने या झेलसंदर्भात निराशजनक प्रतिक्रिया दिली. चेंडू सीमारेषेपलीकडे असेल तर तो पकडणे वैध आहे असे मला वाटत नाही. पंचांनी हा निर्णय योग्य असल्याचे सांगितल्यानंतर मी मैदान सोडले. २०१७ मध्ये क्रिकेटच्या नियमावलीमध्ये काही बदल करण्यात आले होते. यावेळी सीमारेषेवर हवेत झेल पकडला तर फलंदाजाला बाद देण्याचा नियमाचा उल्लेख करण्यात आला आहे. या नियमानुसारच पंचांनी वेडला बाद दिले.