पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : एकमेकांना धडकूनही बहाद्दर सुखरुप क्रिजमध्ये पोहचले

बीबीएलच्या सामन्यातील घटना

ऑस्ट्रेलिया सुरु असलेली बिग बॅश लीग स्पर्धा आता अखेरच्या येऊन पोहचली आहे. सिडनी सिक्सर हा संघ फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. त्याच्यापाठोपाठ सिडनी थंडरला पराभूत करत मेलबर्न स्टार्सने फायनल गाठली आहे. स्पर्धेचे जेतपद उंचावण्यासाठी दोन्ही संघ ८ फेब्रुवारीला एकमेकांसमोर भिडणार आहेत.

IPL : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, जोफ्राची स्पर्धेतून माघार

तत्पूर्वी  फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्स यांच्यात गुरुवारी  उपांत्य सामना रंगला होता.   मेलबर्न स्टार्सने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आघाडी कोलमडल्यानंतर मार्कस स्टोयनीसने ५४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ८३ धावा करत संघाचा डाव सावरला. त्याला निक लॅरकिनने उत्तम साथ दिली. लॅरकिनने ४९ चेंडूत नाबाद ८३ धावा कुटल्या.
स्टोनिस-लॅरकिन यांच्यातील भागीदारी दरम्यान सामन्यात एक कमालीचा किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले. धावा वाढवण्यासाठी फटकेबाजी करताना दुहेरी धाव काढताना चेंडूकडे पाहत दोघांनी एकमेकांना धडक दिली.

स्वप्नातील संकल्प सिद्धीसाठी 'दादा' इंग्लंड दौऱ्यावर

बीबीएलच्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोन्ही फलंदाज चेंडूकडे पाहण्याच्या नादात एकमेकांना धडकल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे जोरात एकमेकांना धडकल्यानंतर पुन्हा सावरत त्यांनी दोन धावा पूर्ण केल्याचेही पाहायला मिळते. या सामन्यात मेलबर्न स्टार्सने निर्धारित २० षटकात १९४ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडरचा संघ निर्धारित २० षटकात ८ बाद १६६ धावापर्यंतच मजल मारु शकला.