पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शेर-ए-बांग्ला ढेर' अफगाणचा कसोटीत 'शानदार' विजय

राशिदच्या नेतृत्वाखालील अफगाण संघाने बांगलादेशला घरच्या मैदानावर नमवले

बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. अखेरच्या दिवसांपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला २२४ धावांनी पराभूत केले. सामन्याच्या अखेरच्या दिवशी विजयासाठी अफगाणिस्तानला बांगलाचे चार गडी बाद करायचे होते. मात्र वारंवार बरसणाऱ्या पावसामुळे सामना अनिर्णित राहण्याची चिन्हे निर्माण झाली होती. 

'रड्या' म्हणूनच स्मिथ लक्षात राहिल! माजी गोलंदाजाचा बाउन्सर

यावेळी कर्णधार राशिद खानने आपल्या फिरकीच्या जोरावर सामना अफगाणिस्तानच्या बाजूने फिरवत बांगलादेशला घरच्या मैदानावर पराभवाची धूळ चारली. पाचव्या दिवसाच्या खेळातील अखेरच्या ७-८ षटकांचा खेळ शिल्लक असताना अफगाणिस्तानला विजयासाठी दोन विकेट्सची गरज होती. राशिद खानने उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.  राशिद खानने या सामन्यात पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ६ बळी टिपले.  

Video : इंग्लंडची टीम हारली, पण स्टोक्सनं चाहत्यांची मनं जिंकली

चटगावच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३४२ धावा केल्या होत्या. यात रहमत शहाच्या शतकाचा समावेश होता. त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या २०५ धावांत आटोपला. अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात २६० धावा केल्या. दुसऱ्या डावात ३९७ धावांचे आव्हान परतवण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ १७३ धावांत आटोपला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: bangladesh vs afghanistan only test afghanistan created history after winning the test by 224 runs ban vs afg