पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अफगाणिस्तानला नमवत बांगलादेशची पाचव्या स्थानावर झेप

बांगलादेशने स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे

साऊथहॅम्पटनच्या मैदानात अफगाणिस्तानला ६२ धावांनी नमवत बांगलादेशने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना यष्टिरक्षक मुशफिकुर रहिम आणि शाकिब अल हसनच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित ५० षटकात ७ बाद २६२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ ४७ षटकात २०० धावांत आटोपला. या विजयासह बांगलादेशने स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. 

बांगलादेशच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लिटन दास (१६) धावा करुन तंबूत परतला. मुजीबच्या गोलंदाजीवर शाहिदीने घेतलेल्या झेलचीही चांगलीच चर्चा रंगली. रिप्लायमध्ये चेंडू जमीनीला टेकल्यासारखे दिसत होते. मात्र मैदानातील पचांनी दिलेला निर्णय कायम ठेवत तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद घोषित केले. संयमी खेळी करणाऱ्या तमीम इक्बाललाही मुजीबने ३६ धावांवर बाद केले. त्यानंतर शकिब अल हसन आणि मुशफिकुर रहिम यांनी बांगलादेशच्या डावाला आकार दिला.

#BANvAFG Controversy Video: तुम्हीच ठरवा हा झेल योग्य होता का?

या जोडीने रचलेल्या भागीदारीत महमदुल्लाह (२७) आणि मोसदेक हुसेन (३५) धावांची जोड दिली. त्यामुळे बांगलादेशला निर्धारित ५० षटकात ७ बाद २६२ पर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानकडून मुजीबने सर्वाधिक तीन बळी बाद केले. कर्णधार गुलबदिन नैब २, मोहम्मद नबी आणि दवलत जादरन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

बांगलादेशने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार गुलबदिन नैब (४७) आणि रहमत शहा (२४) यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर मध्यफळीत हशमतुल्लाह (११), अफगान (२०), मोहम्मद नबी (०) स्वस्तात माघारी फिरल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ बॅकफूटवर आला. समीउल्लाहने नाबाद ४९ धावांची खेळी करत खिंड लढवण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजून त्याला साथ मिळाली नाही. परिणामी अफगाणिस्तानचा संघ २०० धावांत आटोपला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.  

ICC World Cup 2019 Point Table: चौथ्या स्थानासाठी चार संघ शर्यतीत

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bangladesh vs Afghanistan Highlights World Cup 2019 Shakibs all round show hands Bangladesh 62 run win