भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीनंतर विश्रांतीवर होता. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातून तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरण्यापूर्वी विराट कोहली इंदुरमध्ये गल्ली क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले.
विक्रमी कामगिरीसह चाहरची क्रमवारीत गरुड झेप!
कोहलीने मध्य प्रदेशमधील इंदुर येथील रेसिडेंशियल कॉलनीतील आपल्या चाहत्यांसोबत क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. विराट कोहलीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. उल्लखनिय आहे की, १४ नोव्हेंबरपासून इंदुरच्या होळकर मैदानात भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. विश्रांतीनंतर विराट इंदोरमध्ये दाखल झाला आहे. बिचोली-मर्दाना स्थित श्रीजीवेली कॉलनीत विराट कोहली एका चित्रिकरणासाठी आला होता. त्यावेळी त्याने बच्चे कंपनीसोबत क्रिकेट खेळताना दिसला. विराट कोहलीला पाहण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
मेस्सीचा हॅटट्रिकचा पराक्रम, रोनाल्डोच्या विक्रमाशी बरोबरी
इंदुरमधील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ मंगळवारी सरावासाठी मैदानात उतरणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपशी संलग्नित आहे. सध्याच्या घडीला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कामगिरीत सातत्य राखून भारतीय संघ आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.