भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या संघाने कसून सराव केला. दिल्लीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू तोंडाला मास्क बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीतील हवेचा दर्जा खालावला असून दिवाळीनंतर प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. याचा आरोग्यावर परिणाम होऊ नये याची खबरदारी म्हणून संघातील काही खेळाडूंनी तोंडाला मास्क बांधून सराव करण्याला प्राधान्य दिले.
IND vs BAN : दिल्लीतील प्रदूषणामुळे खेळ दूषित होणार नाही : रोहित शर्मा
#WATCH Bangladeshi players practice ahead of the 1st T20i against India on November 3 at the Arun Jaitley Stadium, Delhi. #IndvsBan pic.twitter.com/mVnpqmv63v
— ANI (@ANI) November 1, 2019
गोलंदाजी प्रशिक्षक डॅनियल व्हिक्टोरी, फलंदाजी प्रशिक्षक रसेल डॉमिंगा यांच्याशिवाय लिटन दास आणि अल अमीन हुसैन यांनी तोंडाला मास्क बांधून सराव केला. लिटन दासने सरावाच्या सुरुवातीची १० मिनिटे तोंडाला मास्क बांधला होता. नेटमध्ये फलंदाजी करताना त्याने मास्क काढून फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.
कृपया माझ्या नावाचा वापर करु नका, अनुष्काच्या भावनांचा बांध फुटला
यापूर्वी २०१७ मध्ये दिल्लीच्या मैदानात भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यातही प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. श्रीलंकन खेळाडू मास्क बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. भारत-बांगलादेश सामन्यावेळी असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी सामना अन्य ठिकाणी खेळवण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र बीसीसीआयने सामना दिल्लीच्या मैदानातच खेळवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.