पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आतापर्यंत झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांवर एक नजर..

दिवस-रात्र कसोटी सामना पिंक चेंडूवर खेळवण्यात येतो.

भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ कोलकाताच्या मैदानात ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघाचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना आहे. कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानात होणाऱ्या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या सामन्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आठ संघांनी दिवस-रात्र कसोटी  सामने खेळले आहेत. नजर टाकूयात आतापर्यंत रंगलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांवर...

अनुष्कानंतर आता विराटचाही होणार सन्मान

#ईडन गार्डनच्या मैदानात भारत-बांगलादेश हे दोन्ही संघ पहिला दिवस-रात्र सामना खेळतील. यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियाई संघानी दिवस-रात्र सामना खेळला आहे.  

#पहिला दिवस-रात्र कसोटी सामना हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात आला होता.  २७ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून सामना जिंकला होता.  

#सर्वाधिक दिवस-रात्र कसोटी सामने हे ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात आले आहेत. या ठिकाणी सर्वाधिक ३ दिवस-रात्र कसोटी सामने खेळवण्यात आले असून सर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे.  

#ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ५ दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिज ३ आणि श्रीलंकाने २ दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत.  

स्वप्नातही अंजिक्यला पिंक बॉलच दिसतोय

#फलंदाजांचा विचार केला तर दिवस-रात्र कसोटी सामन्यात पाकिस्तानी फलंधाजांचा बोलबाला राहीला आहे. पाकिस्तानचा सलामीजी फलंदाज अजहर अलीने ६ डावात ९१ च्या सरासरीने ४५६ धावा केल्या आहेत. दिवस-रात्र कसोटी सामन्यात त्रिशतकी खेळी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. पाकिस्तानचा असद शफीक असा एकमेव फलंदाज आहे की, ज्याने दिवस-रात्र कसोटी सामन्यात दोन शतके झळकावणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.  

#गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा राहीला आहे.  डावखुऱ्या मिचेल स्टार्कने दिवस-रात्र कसोटी सामन्यात सर्वाधिक २६ बळी टिपले आहेत. सर्वोच्च कामगिरीचा विचार केल्यास पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विंडीजच्या देवेंद्र बिशूने एका डावात ४९ धावा खर्च करुन ८ बळी ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Bangladesh tour of India 2019 Pink ball test all day night test match results and record