पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs BAN : भारतीय वाघांसमोर राजकोटवर मालिका वाचवण्याचे आव्हान

राजकोटच्या मैदानावर दुसरा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-२० सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राजकोटच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.   

राजकोटमधील दुसऱ्या टी-२० सामन्यावर वादळाचे सावट घोंगावत होते. मात्र महा चक्रीवादळामुळे राजकोटला पावसाचा फटका बसेल असा अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आला होता. परिणामी सामना रद्द होण्याची शक्यता होती. पण नियोजित वेळेत म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता सामना सुरु होणार असल्याचे वृत्त आहे.  महा चक्रीवादळाचा याठिकाणी कोणताही परिणाम न झाल्याने क्रिकेट प्रेमींचा हिरमोड टळणार आहे.   

मिसरुड नसलेल्या पोराकडून कुबळेंच्या विश्वविक्रमी कामगिरीची पुनरावृती

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने ट्विटच्या माध्यमातून सामन्यासाठी हवामान अनुकल असल्याचे म्हटले आहे. मैदानात चांगले ऊन पडल्याचे दिसत असून सामन्यात कोणताही व्यत्यय येणार नसल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने देखील महा चक्रीवादळाचा धोका टळल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सामन्याला फटका बसणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशने ऐतिहासिक विजयाची नोंद करत भारताला दणका दिला होता. या विजयानंतर त्यांच्यातील आत्मविश्वास दुणावला आहे. टी-२० मध्ये भारतीय संघाला पहिल्यांदा पराभूत करणारा बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध मालिका जिंकण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. त्यांच स्वप्न पूर्ण होणार की भारतीय संघ कमबॅक करुन त्यांच्या भ्रमनिरास होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

INDvsBAN : रोहितला खुणावतोय आणखी एक विक्रम, पण...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bangladesh tour of India 2019 India vs Bangladesh rajkot t20i sca stadium is well prepared for the second t20 match