पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN : बांगलादेशला रोहितच्या वादळी खेळीचा तडाखा

रोहित शर्मा

भारताचा कार्यवाहू कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने पहिल्या डावातील कडते भरून काढत बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभरावा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माने राजकोटच्या मैदानात धावांची बरसात केली. रोहित शर्माने अवघ्या २३ चेंडूत षटकाराने अर्धशतक साजरे केले. तो टी-२० तील पाचव्या शतकाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत असताना अमिनुलने त्याला झेलबाद केले. रोहितने या सामन्यात ४३ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. यात ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. 

किंग कोहलीला जमलं नाही ते स्मृतीनं करुन दाखवलं

यापूर्वी त्याने २०१६ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. २०१७ मध्ये इंदोरच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध त्याने २३ चेंडूत २०१८ मध्ये इंग्लंडच्या ब्रिस्टोलमध्ये इंग्लंडविरुद्ध २८ चेंडूत आणि २०१९ मध्ये न्यूझीलंडच्या ऑकलंडच्या मैदानात २८ चेंडूत अर्धशतक झळकवण्याचा कारनामा केला होता. 

कोहलीसोबत खेळलेल्या क्रिकेटर्संना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक

उल्लेखनिय आहे, रोहित शर्माचा हा आंतरराष्ट्रीय टी-२० तील १०० वा सामना होता. शंभराव्या सामन्यात शतकाने हुलकावणी दिली असली तरी रोहितच्या खेळीने बांगलादेशच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यातील विजय सोपा झाला. तीन सामन्यांच्या  मालिकेत १-० असे पिछाडीवर असताना रोहितची ही खेळी भारतासाठी महत्त्वपूर्ण अशीच आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bangladesh tour of India 2019 India vs Bangladesh 2nd T20I Rohit Sharma record Fewest balls to 50